Skip to main content

Demo Court Matter

 

Comments

Popular posts from this blog

ईश्वराकडे part 1

  मार्च १ ९ ८२ मध्ये आश्रमात चेटीचंड , चैत्र शुक्ल द्वितीयेचे ध्यानयोग शिबिर चालले आहे . प्रातःकाळी साधक बंधू - भगिनी पूज्यश्रींच्या मधुर आणि पावन सान्निध्यात ध्यान करीत आहेत पूज्य श्री त्यांना ध्यानाद्वारे जीवन आणि मृत्यूच्या खोल पातळीमध्ये उतरवीत आहेत , जीवनाच्या गुप्त रहस्यांचा अनुभव करवीत आहेत . साधक लोक ध्यानामध्ये पूज्यश्रींच्या धीर गंभीर , मधुर वाणीच्या तंतूच्या सहाऱ्याने आपल्या अंतरामध्ये उतरत जात आहेत . पूज्यश्री म्हणत आहेत ] इन्द्रियार्थेषु वैराग्यं अनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ इन्द्रिय - विषयांमध्ये विरक्ती , अहंकाराचा अभाव , जन्म , मृत्यू , वृध्दत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख आणि दोष पाहणे ( हे ज्ञान होय ) ( भगवद्गीता १३-८ ] आज पर्यंत अनेक जन्मांची कुटुंबे आणि परिवार तुम्ही सजविले , शोभविले मृत्यूच्या एका झटक्याने ते सर्व सुटून गेले . म्हणून आतापासूनच कुटुंबाचा मोह मनोमन दूर करा . जर शरीराच्या इज्जत - अबूची इच्छा असेल , शरीराच्या मान - मर्यादेची इच्छा असेल तर आध्यात्मिक मार्गामध्ये मोठा अडथळा निर्माण होईल . फेकून द्या शरीराची ममता , निर्दोष...