आपल्या मनाला समजवा की तुझी देखील हीच अवस्था होणार आहे . तू देखील अशाच प्रकारे उठणार आहेस . याच प्रकारे जळणार आहेस . बेईमान मना ! तू प्रेत यात्रेमध्ये देखील प्रामाणिकपणा ठेवीत नाहीस ? घाई करीत आहेस ? घड्याळ पहात आहेस ? ' ऑफिसमध्ये जावयाचे आहे . दुकानावर जायचे आहे ? अरे ! अखेर तर स्मशानात जावयाचे आहे हेही तू समजून घे . ऑफिसमध्ये जा , दुकानावर जा , सिनेमाला जा , कोठेही जा परंतु अखेर तर स्मशानातच जायचे आहे . तू बाहेर किती जाशील ? हे मूर्ख मनुष्या ! हे मायेच्या खेळण्या शतकानु शतके माया तुला नाचवीत आली आहे . जर तू ईश्वरासाठी नाचला नाहीस , परमात्म्यासाठी नाचला नाहीस तर माया तुला नाचवीत राहील . तू प्रभु प्राप्तीसाठी नाचला नाहीस तर कशा कशा योनींमध्ये नाचवील . कधी माया तुला न जाणो माकडाचे शरीर मिळेल . तर कधी अस्वलाचे , कधी गंधर्वाचे शरीर मिळेल तर कधी किन्नराचे , मग त्या शरीरांना तू आपले मानशील . कोणाला आपली आई मानशील तर कोणाला बाप , कोणाला मुलगा मानशील तर कोणाला मुलगी , कोणाला काका मानशील तर कोणाला काकू , त्या सर्वाना आपले बनवशील . मग तेथे देखील एक झटका येईल मृत्यूचा , आणि त्या सर्वाना देख