Skip to main content

ईश्वराकडे part 1

  मार्च १ ९ ८२ मध्ये आश्रमात चेटीचंड , चैत्र शुक्ल द्वितीयेचे ध्यानयोग शिबिर चालले आहे . प्रातःकाळी साधक बंधू - भगिनी पूज्यश्रींच्या मधुर आणि पावन सान्निध्यात ध्यान करीत आहेत पूज्य श्री त्यांना ध्यानाद्वारे जीवन आणि मृत्यूच्या खोल पातळीमध्ये उतरवीत आहेत , जीवनाच्या गुप्त रहस्यांचा अनुभव करवीत आहेत . साधक लोक ध्यानामध्ये पूज्यश्रींच्या धीर गंभीर , मधुर वाणीच्या तंतूच्या सहाऱ्याने आपल्या अंतरामध्ये उतरत जात आहेत . पूज्यश्री म्हणत आहेत ] इन्द्रियार्थेषु वैराग्यं अनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ इन्द्रिय - विषयांमध्ये विरक्ती , अहंकाराचा अभाव , जन्म , मृत्यू , वृध्दत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख आणि दोष पाहणे ( हे ज्ञान होय ) ( भगवद्गीता १३-८ ] आज पर्यंत अनेक जन्मांची कुटुंबे आणि परिवार तुम्ही सजविले , शोभविले मृत्यूच्या एका झटक्याने ते सर्व सुटून गेले . म्हणून आतापासूनच कुटुंबाचा मोह मनोमन दूर करा . जर शरीराच्या इज्जत - अबूची इच्छा असेल , शरीराच्या मान - मर्यादेची इच्छा असेल तर आध्यात्मिक मार्गामध्ये मोठा अडथळा निर्माण होईल . फेकून द्या शरीराची ममता , निर्दोष बालका सारखे व्हा . या शरीराचा खूप सांभाळ केला . अनेक वेळा याला आंघोळ घातली अनेक वेळा खाऊ - पिऊ घातले , अनेक वेळा फिरविले , परंतु ... परंतु हे शरीर नेहमी तक्रारच करीत राहिले . कधी आजारपण , कधी अनिद्रा , कधी सांधेदुखी , कधी डोकेदुखी , कधी पचन अपचन , शरीराची गुलामी खूप केली . मनोमन आता शरीराचा प्रवास पूर्ण करा . शरीराला कुठपर्यंत ' मी ' मानीत राहणार बाबा ... ! आता दृढतापूर्वक मनानेच अनुभव करीत चला की तुमचे शरीर समुद्र किनारी फिरावयास गेले आहे . बाकावर बसले आहे . सागराच्या सौन्दर्याचे निरीक्षण करीत आहे . एक शेवटचा जोरदार झटका आला . तुमची मान वाकडी झाली . तुम्ही मेलात .

घरीच डोके दुखू किया सेटमध्य ताप आला आणि तुम्ही तुम्ही लिहिला लिहिला आ तुमची हार्टफल झाला आणि तुम्ही मला तुम्ही पूजा करता करता , आता झोपलाल मित्रांना कु आले . त्यांनी विचारल कार्य झाल ? काही प्राणज्योत माल तुम्ही रस्त्याने जात होता अचानक काही अना अपघात झाला आणि तुम्ही निश्चितच काही ना काही निमिया मृत्यूने तुम्हाल पहा मरण्यापूर्वी एक वेळ मरुन पहा समजणार देखील नाही म्हणून एक क पूर्वी विखरून पहा . त आह त दृढतापूर्वक निश्चय करा की तुमचे जे दिशान शरीर आह ज्याला तुम्ही नाव आणि रूपाने ' मी म्हणून त्या शरीरावा , त्या देहाचा ध्यास साधनेच्या अखेरच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ही आहे . या देहाच्या समतेच्या पलीकडे जावे लागेल जोन्टीत देहाची ममता राहील तोपर्यंत केलेली कर्जे तुमच्यासाठी बनून राहतील . जोपर्यंत हामध्ये ती कायम राहील विकार तुमचा पाठलाग सोडणार नाही . तुम्ही लाख उमदा केले तरी जोपर्यंत देहाघ्यास कायम राहील तोपर्यंत ईश्वराचीनी गायिली जाणार नाहीत . जोपर्यंत तुम्ही स्वतःला देहमानी तोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होऊ शकणार नाही . तुम्ही स्वत मांस , त्वचा , खत , मलमूत्र , विष्टेचा थैला मानीत रहाल तो दुर्भाग्यापासून पिंड सुटणार नाही . मोठ्यात मोठे आहे जन्म घेणे आणि मरणे हजारो सुविधांमध्ये एकाद्याने जन्म घेतला तरी काय फरक पडणार ? त्या बिचान्याला दुःख झेलावीच लागतात हृदयपूर्वक प्रामाणिकपणे ईश्वराला प्रार्थना करा की है हे दयेच्या सागरा ! तुझ्या दरवाजाशी आली आहोत , तुझ्या जानककाहीच कमतरता नाही . तू आम्हाला बळ दे तू आम्हाला हिंमत दे की तुझ्या मार्गावर पाऊल टाकले आहे तर पोहोचल्यावरच थांबू हे माझ्या प्रभू ! देहाची ममता तोडून टाकून तुझ्या बरोबर आमच्या मनाला जोडून टाक . ' ३ असेल , देहाचे आजपर्यंत पूर्वीच्या अनेक जन्मांमध्ये तुमचे अनेक पिता झाले असतील , माता झाल्या असतील अनेक नाते - संबंधी झाले असतील . त्यापूर्वी देखील काही झाले असतील , आणि त्यापूर्वी देखील काही झाले असतील , देहाविषयी तुमचे आकर्षण जितके प्रगाढ तेवढे हे नाते संबंधांचे ओझे तुमच्यावर कायम राहील .. आकर्षण जितके कमी असेल तेवढे ओझे हलके होईल . आतून देहाची ममता तुटली की बाहेरची ममता तुम्हाला फसविण्यामध्ये समर्थ होऊ शकणार नाही . आतून देहाची आसक्ती तुटली की बाहेरील ममता तुमच्यासाठी खेळ बनेल , तुमच्या जीवनातून पुन्हा जीवन्मुक्तीची गीते निघतील . जीवन्मुक्त लोक सर्वामध्ये असून सुद्धा सर्व काही करीत राहून सुद्धा सुखपूर्वक जगतात , सुखपूर्वक खातात - पितात , सुखपूर्वक येतात जातात , सुखपूर्वक स्व स्वरूपामध्ये समाविष्ट होतात . केवळ ममता दूर करावयाची आहे . देहाध्यास दूर झाला की ममता देखील संपली . देहाची अहंता दूर करण्यासाठी आज स्मशानयात्रा करा . जिवंतपणी थोडे मरा . घाबरू नका . आज मृत्यूला बोलवा- ' हे मृत्यू ! तू या शरीरावर आज उतर ' " कल्पना करा की तुमच्या शरीरावर आज मृत्यू उतरत आहे . तुमचे शरीर लुळे झाले . कोणत्या तरी निमित्ताने तुमचे प्राण निघून गेले . तुमचे शव पडले आहे . लोक ज्याला आजपर्यंत ' अमुक बंधू , अमुक सेठ , अमुक साहेब .. म्हणत होते , त्याचे प्राण आज उडून गेले . आज तो लोकांच्या नजरेमध्ये प्रेत होऊन पडला आहे . हकीम डॉक्टरांनी हात धुतले आहेत . ज्या शरीराचे तुम्ही इतके पालनपोषण केले , ज्याची इज्जत अब्रू सांभाळण्यामध्ये व्यस्त राहिलात , ते शरीर आज मृत झाले . समोर पडले आहे . तुम्ही त्याला पहात आहात . गर्दी गोळा झाली . कोणी खरोखरच अश्रू ढाळीत आहे , कोणी खोटे खोटे रडत आहे .


 तुमचा मृत्यू झाला . शव पडले आहे . लोक आले , मित्र आले , शेजारी आले , साथी आले , स्नेही आले . टेलीफोन केले जात आहेत , टेलीग्राम दिले जात आहेत . मृत्यू झाल्यावर जे व्हावयास हवे ते सर्व केले जाऊ लागले . ही शेवटची ममता आहे देहाची , जी ओलांडल्याशिवाय कोणी योगी सिध्द बनू शकत नाही , कोणताही साधक योग्य प्रकार साधना करू शकत नाही , कोणीही साधक योग्य प्रकारे सौभाग्याला उपलब्ध होऊ शकत नाही . ही अंतिम अडचण आहे . ती करा . मैं अरु मोर तोर की माया । बश कर दीन्हीं जीवन काया ।। तुमचे शरीर कोसळले . ' रामनाम सत है झाले . तुम्ही मेलात .. लोक गोळा झाले . बांबू मागविले जात आहेत . तुम्हाला आंघोळ घालण्यासाठी घरामध्ये नेत आहेत . लोकांनी उचलले . तुमची मान निर्जीव झाली . हात पाय निर्जीव झाले आहेत . लोक तुम्हाला सांभाळून नेत आहेत . एका मोठ्या थाळीमध्ये शवाला आंघोळ घालत आहेत . परंतु ... परंतु तो चमत्कार कोठे आहे ? तो प्रकाश कोठे आहे ? ती चेतना कोठे आहे ? ज्या शरीराने किती किती कमाई केली , किती किती खाल्ले , ज्याला किती किती सजविले , किती किती दाखविले , ते शरीर आज प्रेत झाले . एक श्वास घेणे आज त्याच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे . मित्राला धन्यवाद देणे त्याच्या शक्य नाही . हाताला शक्य नाही . एकाद्या संत फकीराला हात जोडणे त्याला ज्यावर इतके ' टेंशन ' होते आज ते पराश्रित शरीर बिचारे , प्रेत या जगातून चालले . ज्या जीवनासाठी इतकी ओढाताण होती त्या जीवनाची ही अवस्था ? ज्या शरीरासाठी इतकी पापे आणि सन्ताप सहन केले ते शरीर आज या परिस्थितीत पडले आहे . बघा जरा मनाच्या डोळ्यांनी आपल्या शरीराची अवस्था . पडले आहे . आजपर्यंत जे ' मी ' करीत होते , स्वतःला समजत होते , शहाणे समजत होते , चतुर समजत होते लाचार उचित त्या चतुराची अवस्था बघा . संपूर्ण चतुराई समाप्त झाले . 

 known हे Unknown झाले . संपूर्ण ज्ञान एका झटक्यात समाप्त झाले . सर्व नाते संबंध संपून गेले . धन आणि परिवार दुसऱ्याचे झाले . ज्यांच्यासाठी तुम्ही रात्री जागून काढल्या होत्या , ज्यांच्यासाठी तुम्ही मस्तकावर ओझे उचलले होते ते सर्व आज परके झाले बाबा ... ज्यांच्यासाठी तुम्ही पीडा सहन केल्या ते सर्वजण तुमचे कोणी राहिले नाहीत . तुमच्या या प्रिय शरीराची ही अवस्था .... मित्रांच्या हातून तुमचे स्नान केले जात आहे . शरीर पुसले न पुसले , टॉवेल फिरविला न फिरविला आणि तुम्हाला कपडे घातले गेले . नंतर ते उचलून तिरडीवर झोपविले गेले . आता तुमच्या शरीराची ही अवस्था ... ! ज्यांच्यासाठी तुम्ही मोठमोठ्या कमाया केल्या , मोठमोठ्या डिग्री मिळविल्या अनेक ठिकाणी लाचारी केली , तुच्छ जीवनासाठी गुलामी केली , अनेकांना सांभाळले , समजावले , ते लाचार शरीर प्राण निघून गेल्याने तिरडीवर पडले आहे . जिवंतपणी मृत्यूचा अनुभव घ्या . तुमचे शरीर तसे पाहिले तर मेलेलेच आहे . त्यात ठेवले आहे तरी काय ? तिरडीवर पडलेल्या शवावर लाल कपडा बांधला जात आहे . लोंबकळणाऱ्या मानेला सांभाळले जात आहे . पायांना दोरीने घट्ट बांधले जात आहे . रस्त्यात कोठे मुर्दा पडू नये . मानेच्या अवती भोवती दोरी आवळली जात आहे . संपूर्ण शरीर लपेटले जात आहे . तिरडी बनविणारा म्हणत आहे - " तू तिकडून ओढ ! " दुसरा म्हणतो- " मी ओढले आहे , तू गाठ मार !! " परंतु ही गाठ देखील किती वेळ राहणार आहे ? दोऱ्या देखील किती काळ राहणार आहेत ? थोड्याच वेळाने जळून जातील . आणि दोऱ्यांनी बांधलेले शरीर देखील जळण्यासाठीच जात आहे बाबा ... ! या नश्वर जीवनाचा धिक्कार असो , या नश्वर देहाच्या ममतेचा धिक्कार असो , या शरीराच्या अध्यासाचा आणि अभिमानाचा धिक्कार असो . तिरडी कसून बांधली जात आहे . आजपर्यंत तुमचे नाव सेठ साहेबाच्या लिस्ट मध्ये होते . आता ते मुर्द्याच्या लिस्टमध्ये आले लोक म्हणतात- ' मुर्दा लवकर बाधा ! आता असे म्हणणार नाहीत की सेठला , साहेबाला , मुनीमाला , नोकराला , सताला , असताला बांधा परंतु म्हणतील " मुर्दा बांधा . ' " तुमच्या संपूर्ण जीवनाच्या उपलब्धींचा अंत झाला . आजपर्यंत तुम्ही जी कमाई केली होती ती तुमची राहिली नाही . आजपर्यंत तुम्ही जे जाणले होते ते मृत्यूच्या एका झटक्यामुळे सुटून गेले ... तुमच्या इन्कम टॅक्सच्या कागदपत्राना , तुमच्य प्रमोशनच्या आणि रिटायरमेंटच्या गोष्टींना , तुमच्या उपलब्धींना आणि अनुपलब्धींना नेहमीसाठी निरोप घ्यावा लागला . करणार अरेरे मनुष्या तुझा श्वास ! अरेरे तुझ्या कल्पना ! अरेरे तुझी नश्वरता ! अरेरे मनुष्या तुझ्या वासना ! आजपर्यंत इच्छा त होतास इतके प्राप्त केले आहे आणि इतके प्राप्त आहे , इतके जाणले आहे आणि इतके जाणणार आहे , इतक्या लोकांना आपले बनविले आहे आणि इतक्यांना आपले बनवीन , इतक्यांना सुधारले आहे , इतरांना सुधारीन . 

अरे ! तू स्वतःला मृत्यूपासून तर वाचव ! स्वतःला जन्म - मरणापासून तर वाचव ! बघू या तुझी ताकद . बघू या तुझी कारागिरी बाबा ! तुमचे प्रेत बांधले जात आहे . तुम्ही तिरडी बरोबर एक झाला आहात . स्मशान यात्रेची तयारी चालू आहे . लोक रडत आहेत . चार लोकांनी तुम्हाला उचलले आणि घराबाहेर तुम्हाला घेऊन जात आहेत . मागे मागे अन्य सर्व लोक चालले आहेत . कोणी स्नेहपूर्वक आले आहेत , कोणी केवळ देखावा करण्यासाठी नेण्यास आले आहेत . आले आहेत . समाजामध्ये बसलो आहोत म्हणून कोणी निभवून दहा पाच माणसे सेवेच्या हेतूने आली आहेत . त्या लोकांना जाणीव नाही की तुमची देखील हीच अवस्था होणार आहे . स्वत : ला किती काळपर्यंत चांगले दाखविणार आहात ? स्वतःला समाजामध्ये कुठपर्यंत ' सेट ' करीत राहणार आहात ? ' सेठ ' करावयाचेच आहे तर स्वतःला परमात्म्यामध्ये ' सेट ' का करीत नाही बंधू ? दुसऱ्यांच्या प्रेत यात्रांमध्ये जाण्याचे नाटक करता ! प्रामाणिकपणे प्रेत यात्रांमध्ये जात जा .

Comments

Popular posts from this blog

Quiz Demo

Quiz Application you'll have 15 second to answer each question. Select Catagory Time's Up score: Next question See Your Result Quiz Result Total Questions: Attempt: Correct: Wrong: Percentage: Start Again Go To Home